आज माझ्या मराठी बांधवाजवळ इंटरनेट आहे. त्याला इंटरनेटबद्दल सर्व माहिती आहे.
पण माझी एक विनंती आहे. कि जे काही मराठी बांधव आज यशस्वी ब्लोगर आहेत
त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी
संवाद खिडकीची सोय करून दिली तर आमच्यासारख्या
नवीन बांधवासाठी एक सुवर्णसंधी मिळेल.
त्यांच्याशी संवाद साधून आमच्या ज्ञानाची भूक मिटविता येईल.
त्या संवाद खिडकिमध्ये मला पुढील गोष्टी आवश्यक वाटतात

  • जे काही यशस्वी ब्लोगर आहेत त्यांनी नवख्यांना मार्गदर्शन करावं.
  • त्यांनी त्यांना आलेल्या अडचणी सांगाव्यात.
  • जे मराठी बांधव कुठल्या विषयात तज्ञ असतील त्यांनी इतर बांधवाना प्राविण्य करावं त्यांच्या अडचणी सोडवाव्यात.
  • नवीन नोकरी- उद्योगधंद्याची माहिती द्यावी.
  • नवीन ब्लोग -साईट्सची माहिती द्यावी

त्या संवाद खिडकीमध्ये आपल्या मराठी बांधव एकत्र येतील अशी व्यवस्था करावी.

त्यामुळे नवख्यांना पुढील फायदे मिळतील.

सर्व अडचणी येथे सोडवल्या जातील.
नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.
नवीन काही गोष्टीत आपल्या बांधवाना सहभागी करता येईल.

तरी आपल्या मातृभाषेत संवाद खिडकीमध्ये कसा संवाद साधावा?
तर मला वाटते की आता आपणाला आपल्या मातृभाषेत संवाद सांधता येत नसेल तरी आपण इंग्लिशमध्ये मराठी टाईप करून संवाद साधू शकतो.
जसे कि आपण ओर्कुट वर करतो

तरी आपल्या मराठी बांधवासाठी अशी संवाद खिडकीची सोय करून मिळावी हि विनंती.
तरी ह्या संवाद खिडकीमध्ये सर्व मराठी बांधव एकत्र येऊन एकमेकांना साहाय्य करतील अशी आशा व्यक्त करतो.

विनंती- अशा साईट्स अगोदरच उपलब्ध असतील तर त्यांची माहिती द्यावी
तरी माझी कल्पना कशी वाटली त्यावर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका
टीप:आक्षेपार्हे लिखाण आढळल्यास क्षमा असावी.

PostHeaderIcon संवाद खिडकी


संवाद खिडकी ची योजना चांगली आहे, यासाठी मी तुम्हाला मदत करायला तयार आहे मी स्वःत री गेले काही महिन ब्लॉगिंग करत आहे. तुमच्या कोणत्याही अडचणी तुम्ही मला मझ्या मेल आइ डी वर पाठवु शकता त्यांचे मी शक्य तितक्या लवकर(बहुदा २४ तासांच्या आत निराकरण करण्याचा प्रयत्न करीन),मी स्वःत एक वेब डिझाइनर आहे आणि गेल्या वर्ष भरा पासुन या व्यवसायात आहे.तेव्हा माझ या अनुभवाचा कुणाला फायदा होणार असेल तर मला खुप आवडेल.अतिशय निसंकोच पणे मला मेल करा.

धन्यवाद!
ओंकार वाळिंबे!
Internet and cyber crime
my social awareness web site on swine flu
my mail id:om.globe@gmail.com

PostHeaderIcon नेटभेट फोरम


माझ्या नेटभेट या साईटवर मी नेहमीच नविन मराठी ब्लॉगर्स साठी उपयुक्त माहीती आणि टीप्स देत असतो. त्याचप्रमाणे ब्लॉगर्सच्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी  नेटभेट फोरम देखील चालवतो.

याखेरीज ब्लॉगर्ससाठी ऑर्कुट सारखीच एक सोशल नेटवर्कींग साईट बनविण्याचा मानस आहे, मात्र नेटभेट फोरमला फारसा प्रतीसाद न मिळाल्याने सध्या तो प्रकल्प बाजुला सारला आहे.

मराठी ब्लॉगर्सना प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी नेटभेट ई-मासिक देखील चालु केले आहे. ऑक्टोबर २००९ चा पहीला अंक http://oct09.netbhet.com येथे पाहु शकता. हा अंक ३०००० मराठी लोकांना ईमेल द्वारे पोहोचवण्यात आला होता. नोव्हेंबरच्या अंकाचे काम चालु आहे आणि यंदा हा अंक १००००० मराठी लोकांना ईमेलद्वारे पाठविण्यात येणार आहे.

सलिल चौधरी

www.netbhet.com

 

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • MoralesLINDSAY32
  • राम कदम
  • गणशा
  • घनशाम
  • sariputt
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि १ अतिथी आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content