वर्डप्रेस हे जगातील सर्वात लोकप्रिय ब्लॉगींग सॉफ्टवेअर आहे. या ठिकाणाहून या वर्डप्रेसच्या कार्यपध्दतीची ओळख, वर्डप्रेस मध्ये ब्लॉग कसा बनवावा? त्याचे विविध प्लग्निन्स कसे वापरावे या बाबत माहिती देण्याचा विचार आहे.

मुळात ब्लॉग म्हणजे रोज लिहील्या जाणारी वेबसाईट असे म्हणूया. ब्लॉगला मराठी अनुदिनी असे म्हणतात.
वर्डप्रेस हे एक मुक्तस्रोत सॉफ्टवेअर आहे त्यामुळे त्यात हवे ते बदल तुम्हाला करता येतात. हा ब्लॉग संपुर्ण मराठीत चालवता येतो. त्यासाठी लागणारे भाषांतर तयार करण्याचे काम लोकायतची टीम करते आहे.
श्री विनायक अनिवसे ह्या प्रकल्पाचे काम बघत आहेत. यापुढे वर्डप्रेस बद्दल, त्याचा वापर, त्याची अनेक प्लगींन्स आदींबाबत ते सविस्तर माहिती देतील.

वर्डप्रेस हे दोन प्रकारे वापरता येतं. एक प्रकार म्हणजे वर्डप्रेस.कॉम वर जाऊन तेथे नोंदणी करावी आणि आपला ब्लॉग(अनुदिनी) सुरू करावी.
दुसरा प्रकार म्हणजे वर्डप्रेसचे सॉफ्टवेअर उतरवून घ्यावे आणि आपल्या वेबसाईटवर त्याची स्थापना करून तो चालवावा.
ह्या दोन्ही प्रकारांची माहिती येथे दिल्या जाईल. तसेच वर्डप्रेसचे मराठीकरण सुध्दा येथे व वर्डप्रेस.ऑर्ग वर प्रकाशित केले जाईल.

लोकायतची वर्डप्रेस टीम मराठीतून ब्लॉग लिहीण्यासाठी सर्वथा मदत करण्यास तयार आहे. तुमचा ब्लॉग, त्यासाठी सुंदर थीम, तो ब्लॉग कसा हाताळावा याची माहिती आदी सर्व तांत्रीक मदत लोकायची वर्डप्रेस टीम करेल.
त्याच वेळी तुमचं योगदान मात्र मराठीत साहित्य निर्मीती झाली पाहिजे असं पाहिजे. तुम्ही मराठीत लिहीलं पाहिजे.

यावर अधीक चर्चा येथे करता येईल किंवा विनायक अनिवसेंशी संपर्क साधता येईल.

PostHeaderIcon मला थीम बदलायची आहे.


पण त्यांनी दिलेली नको तर गुगलून काही थीम मिळतात त्याचे एचटीएमएल कोडींग चिटकवतो तर थीम बदलत नाही. काही पैसे देऊन थीम हवी तशी करा असा संदेश येतो. आम्ही पडलो फुकट वाले काही मार्ग आहे का ?

आणि दुसरे माझ्या ब्लॉवर मी जरा मोठी अक्षरे वापरतो, ते काही ठरावीक अशीच काही एम बी, जी बी अशी काही जागा देतात का ? ज्यामुळे लिहिण्यावर मर्यादा वगैरे येण्याची शक्यता आहे का ?

PostHeaderIcon वर्डप्रेस थीम


बिरुटे सर, तुमचा ब्लॉग नेमका कुठे स्थापीत आहे यावर हे अवलंबून आहे.
जर तुम्ही वर्डप्रेस्.कॉमवर थीम बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर हे शक्य नाही. कारण वर्डप्रेसने तिथे मर्यादीत सेवा दिल्या आहेत. त्यात थीम बदलता येत नाहीत. मात्र तुम्ही स्वतःच्या सर्वरवर तुमचा ब्लॉग स्थापीत केला असेल तर मात्र अशा हजारो मोफत थीमचा खजिना तुमच्याकरिताच आहे.
गुगलवर शोध घेतलात तर अशा बर्‍याच थीम तुम्हाला सापडतील.

PostHeaderIcon स्वतःचा सर्वर


माझा ब्लॉग वर्डप्रेस.कॉम वर नोंदणी करुन चालवतो. पाहा आमचा संवेदना ब्लॉग http://dilipbirute.wordpress.com/ (व्यवस्थापकासः इडीट लिंक मधे लिंक देता येत नाही )

(अजूनही सुजान वाचकांना आमच्या जगप्रसिद्ध ब्लॉगचे पत्ते द्यावे लागतात, छ्या ! हे अपयश आम्हाला बघवत नाही :) )

स्वतःचा सर्वर स्थापन करण्यास काय करावे लागते, आणि त्याचा खर्च किती ?
सर्वर स्थापन करायचा असेल तर आपण त्यासाठी (आर्थिक सोडून) किती मदत करु शकता ?

PostHeaderIcon सर्वर


सर्वर स्थापन करण्याचा खर्च सर्वस्वी तुमच्या निवडीवर अवलंबून आहे. भारतातील होस्टींग संस्था साधारणपणे २००० रु. प्रतीवर्ष या दराने १ जीबीच्या आसपास (लिनक्स सर्वरवर) जागा +डोमेन नेम उपलब्ध करुन देतात. (होस्टींग संस्थेनुसार हे दर बदलू शकतात.)

एकदा सर्वर घेतल्यानंतर वर्डप्रेसच्या स्थापनेपासून व्यवस्थापनापर्यंतची सर्व मदत तुम्हाला लोकायतकडून मिळेल.

PostHeaderIcon धन्यवाद !!!


एकुण रागरंग पाहता सर्वर खरेदी करणे ते समजून घेणे ही गोष्ट माझ्यासाठी अवघड वाटत आहे. तरी आपण जे मदतीचे आश्वासन दिले, त्याबद्द्ल आभारी..!!!

-दिलीप बिरुटे
(आभारी)

PostHeaderIcon मला वाटते मी तुम्हाला या कामी


मला वाटते मी तुम्हाला या कामी मदत करु शकतो. तुम्हास कोणत्या प्रकारची साईट बनवायची आहे हे कळल्यास दील्यास मी आणखीन माहीती देइन
मला salil@netbhet.com वर लिहा.

सलिल
www.netbhet.com

PostHeaderIcon उत्तम प्रकल्प


उत्तम प्रकल्प आहे. लोकायतच्या मुक्तस्त्रोत विभागातला हा पहिलाच प्रकल्प अत्यंत उपयोगी अन मराठी माणसासाठी गरजेचा असा आहे.

PostHeaderIcon लोकायात


खुपच छान

PostHeaderIcon मला सर्वप्रथम मराठी लिहीता


मला सर्वप्रथम मराठी लिहीता आली. याचे कौतुक वाटते. खरोखरच मराठी टायपिग ईतकी सोपी असती तर किती मजा आली असती.

PostHeaderIcon मला माहीती हवी


महोदय,
मी अप्रशिशीक्षक शिक्षन सेवक आहे. मी विज्ञान शिकवतो, मला सर्वकाही येते, परतु मी स्वतः पुर्नपण स्वताच्या शिकवीन्याने स्तुषठ नाही. क्रुपया मार्गदर्शन करा.

PostHeaderIcon माहिती


नेमकी कोणत्या विषयाची माहिती हवी आहे?

PostHeaderIcon फरक


wordpress आणि blogspot मध्ये काय फरक आहे?

PostHeaderIcon वर्डप्रेस व ब्लॉगस्पॉट


वर्डप्रेसच्या दोन शाखा आहेत.wordpress.com व wordpress.org. वर्डप्रेस डॉट कॉम हे ब्लॉगस्पॉट प्रमाणेच मोफत ब्लॉग उपलब्ध करुन देणारे संकेतस्थळ आहे तर वर्डप्रेस डॉट ऑर्ग हे वर्डप्रेसची मुक्तस्त्रोत ब्लॉगींग प्रणाली देणारे संकेतस्थळ आहे.
वर्डप्रेस डॉट कॉमवरील ब्लॉग व ब्लॉगस्पॉटवरील ब्लॉग यांची तुलना केली असता ब्लॉगस्पॉट उत्तम आहे. कारण ब्लॉगस्पॉटवर तुम्ही थीम बदलू शकता,अतिरीक्त प्लगीन्स, विजेट्स वापरु शकता. वर्डप्रेस डॉट कॉम मात्र काही मुलभूत थीम्स,प्लगीन्स व विजेट्सचाच वापर करु देते.अतिरीक्त साधनांचा तिथे वापर करता येत नाही.
मात्र या दोन्ही संकेतस्थळांवर मोफत ब्लॉग बनवण्यापेक्षा वर्डप्रेसची मुक्तस्त्रोत ब्लॉगींग प्रणाली वापरुन स्वतःच्या सर्वरवर ब्लॉग बनवणे केव्हाही चांगले. एकतर ही मुक्तस्त्रोत असल्याने मोफत मिळते. शिवाय यात आपण हवे ते बदल करु शकतो.
वर्डप्रेसच्या काही थीम्सचा व त्यातील सुविधांचा अंदाज घेण्यासाठी तुम्ही वर दिलेल्या दूव्यातील काही 'डेमो' पाहू शकता.ही ज्याप्रकारची संस्थळे आहेत त्याप्रकारची संस्थळे वर्डप्रेस डॉट कॉम आणि ब्लॉगस्पॉट वर बनवणे अशक्य आहे.
आणखी काही माहिती हवी असल्यास इथे प्रतिसादात विचारु शकता.

PostHeaderIcon धन्यवाद


धन्यवाद विनायक. अधिक माहिती हवी असल्यास इथे विचारीनच.

PostHeaderIcon पोवर बिल्डर शिकायचे आहे


पोवर बिल्डर शिकायचे आहे इन्टरनेटवर माहिती मिळेल काय
क्रपया उत्तर sundersakhar@bsnl.in वर पाटवा शकय होइल काय

PostHeaderIcon म् द त क् रा


नोंद घ्यावी फोरम बघा, (तेथे माझे नाव "जोनी सी" आहे.)
मी मराठी मध्ये माझ्या ब्लओग वर कसे लिहू?
धन्यवाद.

PostHeaderIcon मराठी वेबसाईट किंवा ब्लॉग तयार करायचा आहे


मला युनिकोडमध्‍ये मराठी वेबसाईट किंवा ब्लॉग तयार करायचा आहे. व्‍यासायिक उपयोगासाठी (जाहिराती) अशा प्रकारची वेबसाईट तयार करण्‍याची स्‍वस्‍तातील संपूर्ण प्रक्रिया कृपया सांगा. यासंदर्भात कुठे माहिती असल्‍यास त्‍याचा दुवा (लिंक) द्यावी.

भाषा बदला.
मराठी
English

Ctrl+\ ने भाषा बदला.
नवनिर्माण

लोकायतला नवे रुप आणि नवीन सोई लावण्याचा प्रयत्न आहे. या बाबत सदस्यांच्या काही सुचना असतील तर त्यांचे स्वागतच आहे.
याविषयी अधीक चर्चा येथे करता येईल.

सदस्य प्रवेश
आवागमन
शोध
नवीन सदस्य
  • विजय५
  • anil anavkar
  • किरण गायकवाड
  • सातिश कले
  • अमोल मेंढे
सक्रिय सदस्य
सध्या 0 सदस्य आणि 4 पाहुणे आलेले आहेत.
Syndicate
Syndicate content