संगणक चालू केल्यावर आपण आपले नेहमीचे काही प्रोग्रम उघडतो, जसे मी सर्वात आधी विंन्डोज मिडीया प्लेयर, त्यानंतर, माझा "डी" डिस्क, त्यानंतर आई ब्राऊजर
आता हे नेहमीचेच काम, ह्या त्यामुळे मी एक start.bat फाईल तयार केली व माझ्या एका क्लिक ने माझे सर्व नेहमीचे प्रोग्रॆम उघडतात.
आता ही फाईल कशी तयार करावी ?
नोटपॆड उघडा व खाली दिलेल्या प्रमाणे कोड टाईप करा.
cd "C:\Program Files\Windows Media Player\wmplayer.exe"
start wmplayer.exe
cd "C:\Program Files\Internet Explorer\IEXPLORE.EXE"
start IEXPLORE.EXE
आता पर्यंत ऑर्कुट (orkut.com) आणि ब्लॉगस्पॉटला (blogspot.com) भारतीय भाषांत लिहीण्याची सोय गुगल.कॉमने दिली होती. आता हीच सेवा जीमेल या गुगलच्या ईमेल सेवेत समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जीमेल (gmail.com) मधून सरळ मराठी (हिंदी) भाषेत मेल लिहून पाठवता येईल.
खास म्हणजे येथे लिहीण्याची पध्दत सुध्दा तशीच आहे जशी येथे लोकायतवर आपण वापरतो. म्हणजे जसं इंग्रजी स्पेल करू तसं लिहीता येईल. लोकायत वर लिहीण्याची सवय झाली असेल तर जीमेलमध्ये ईमेल लिहीणे अत्यंत सोप्पं आहे.
आता आपण ईमेल मराठीत कसा लिहावा ते बघुया.
भारतात प्रथमच 3G स्पेक्ट्रमवर आधारीत वायलेस ब्रॉडबॅन्डसेवा बिएसएनएल (BSNL) ने केलेली आहे. या सेवेचे मानक इव्हीडीओ (EVDO) असे असल्यामुळे याला इव्हीडीओ असंच म्हणतात.

मुक्तस्त्रोत विश्वाचे आगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा परवाना. मुक्तस्त्रोत मागची प्रेरणा, त्याचा उद्देश्य आणि त्याची व्याप्ती आदी सर्वांची माहिती आपल्याला या परवाण्यातून होते. मूळ परवाना इंग्रजीत आहे. तो येथे बघता येईल. http://www.linux.org/info/gnu.html
मिसळपाव.कॉम वर मित्रांना आवाहन केले होते, सर्वांनी मिळून अनुवाद करण्याचे ठरले. या पानावर त्यांनी दिलेले अनुवाद देण्यात येणार आहेत. या सर्वांवर चर्चा करून शेवटी एक मसुदा तयार करण्याचा विचार आहे.