मित्रांनो गेले काही महिने मंदी आणी अर्थव्यवस्थेच्या संक्रमणामुळे अनेकांवर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे,अशातच वाढलेली ,महागाइ या भडक्यात तेलच ओतत आहे.अश्या वेळेस प्रत्येक थरातील अगदी गृहीणींपासुन ते विद्यार्थांपर्यंत प्रत्येकालाच पैशांची चणचण भासत आहे.अशा वेळेस एक खात्रीशीर आणि महिना ४०००-५०००/- रु. इतके उत्पन्न देणारा व्यवसाय कोणता असा मी विचार करत असताना माझ्या मनात एक विचार आला की "मराठी टंकलेखन" हा एक उत्तम व्यवसाय का नाही होउ शकत?
मुक्तस्त्रोत विश्वाचे आगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा परवाना. मुक्तस्त्रोत मागची प्रेरणा, त्याचा उद्देश्य आणि त्याची व्याप्ती आदी सर्वांची माहिती आपल्याला या परवाण्यातून होते. मूळ परवाना इंग्रजीत आहे. तो येथे बघता येईल. http://www.linux.org/info/gnu.html
मिसळपाव.कॉम वर मित्रांना आवाहन केले होते, सर्वांनी मिळून अनुवाद करण्याचे ठरले. या पानावर त्यांनी दिलेले अनुवाद देण्यात येणार आहेत. या सर्वांवर चर्चा करून शेवटी एक मसुदा तयार करण्याचा विचार आहे.